बारावी गुणपडताळणी,उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी अर्ज कसा करायचा ?

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी २२ मे ते ०५ मे पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

बारावी गुणपडताळणी,उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी अर्ज कसा करायचा ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

HSC  Result 2024 :बारावी ऑनलाईन निकालानंतर(12th Online Result)कोणत्याही विशिष्ट विषयात विद्यार्थ्याने मिळवलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती,पुनर्मूल्यांकनासाठी (Verification of marks and photocopies of answer sheets, revaluation)संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या या http://verification.mh-hsc.ac.in अधिकृत संकेतस्थळावरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी २२ मे ते ०५ मे पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

 फेब्रुवारी-मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

 फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व फेब्रुवारी-मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

 जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक २७/०५/२०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येणार आहे.